आम्ही आलो आहोत...
बा अदब! बा मुलाईजा! हो. . .शियार !!
मी आलो आहे. तुमच्या मोठ्या दुनियेत मी माझे छोटे पाय 25 डिसेंबर 2005 रोजी नातळ सण असतांना, पुणे येथे श्री. निलेश व सौ. कृपाली गावडे यांच्या घरी ठेवले आहेत. येताना मी थोडेसे आढेवेढे घेतल्यामुळे आईला दवाखान्यात ठेवले होते, पण चालायचेच. . . त्याशिवाय आमचे महत्व तरी कशे कळणार जगाला.
आता मी दवाखान्यातुन आई बाबांच्या घरी स्थिरावतोय तेव्हा आपली भेट होतच राहील.
जाता जाता सांगयचे राहीलेच, मी ऐकले आहे की माझे बाबा इथेच कुठे तरी माझा बद्दल लिहीत असतात म्हणुन. चांगले आहेत ते, पण इतक्या थोड्या वेळात एखाद्याला ओळखता नाही येत. तरी ते माझ्याबद्दल काय लिहीतात ते मला अवश्य सांगत जा. माझ्या बद्दल काही वाईट लिहीले, माझी तक्रार करत असतील तर अजीबात लक्ष देउ नका.
आता येतो मी. पुन्हा भेटु.

1 Comments:
वाह आपली अनुदिनी व त्याची संकल्पना दोन्ही अवडल्या.
(जमल्यास वा या आधिच सदस्य नसल्यार www.manogat.com व mr.wikipedia.org या दोन मराठी संकेतस्थळांना आवश्य भेट द्या.)
Post a Comment
<< Home