माझे मोठे बाळ विश्व !!

Monday, January 09, 2006

उडी मारण्याचा प्रयत्न. .

आज दुपारी मला खुप चेवच चडला होता. दुध पिऊन झाल्यावर मस्त ढेकर देऊन खाटेवर पहुडलो होतो. थोडावेळ इकडे-तिकडे बघितले पण काही नीट दिसेना. सगळे पहिल्यासारखे अस्पष्ट. एवढ्यात समोर काहितरी हलले. आज आईने मला दुपट्यात गुंडाळले नव्हते, त्यामुळे हात-पाय मोकळेच होते. मग मी ती हलणारी वस्तु हाताने पकडायचा प्रयत्न केला. बराच वेळ हात हलवला, तरी ती वस्तु काही हाती लागेना. आता म्हंटलं काय करायचे. परत इकडे-तिकडे बघितले. आईचा कानोसा घेतला. ती जवळच होती पण तीचा आवाज येत नव्हता. मला वासावरुन समजले. नहुतेक तिने गाई केली असावी. मग काय! ठेवला पाय आणि मारली उडी. कंबर वर उचलली पण बाकी शरीर काही वर उचलले गेले नाही. मग मी परत प्रयत्न केला. मात्र ह्यावेळेस आईनेच मला उचलले आणि माझे खुप पा घेतले. मला काही कळलेच नाही, माझे एकदम एवढे कौतुक कशाला ते.
ह्या मोठ्या लोकांच काही कळतच नाही. मी जरा काही करेन म्हंटलं तर लगेच उचलतात आणि पटापट पा घ्यायला सुरवात करतात. आईचे ठिक आहे, पण बाकीच्यांनी घेतलेले मला अजिबात आवडत नाही.
बाबा आले की मी बाबांना सांगणार, सगळ्यांचे नाव. ह्यांच्या पा घेण्याच्या भानगडीत ती हलणारी वस्तु कुठेतरी हरवली. त्यानंतर झोपेतुन जागे झाल्यावर ती परत दिसते का ते बघीतले पण ती परत दिसलीच नाही.
सगळा मुड गेला...

0 Comments:

Post a Comment

<< Home